परभणी/गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील खळी तांडा येथे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडत रोख रक्कम आणि सोन्या – चांदीचे दागिने मिळून ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर १९ जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्याचे नेकलेस, झुंबर, १० तोळे चांदी रोख ३० हजार रुपये चोरी
बालासाहेब किशनराव जाधव यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मुलासह इसाद येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तर त्यांची पत्नी आणि सुन शेतामध्ये गेल्या होत्या. सोळा वर्षीय नातू घरी होता. दुपारच्या वेळी नातू बिस्कीट आणण्यासाठी घराला कुलूप लावून दुकानावर गेला. अचानक पाऊस आल्याने तो दुकानावरच थांबला. थोड्या वेळाने घरी परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडला दिसला. घटनेची माहिती नातवाने फिर्यादीच्या मुलाला दिली. घरी जावून पाहणी केल्यावर सोन्याचे नेकलेस (Gold necklace), झुंबर, १० तोळे चांदी(Silver), रोख ३० हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. गंगाखेड पोलीस अधिक तपास करत आहेत.