हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परभणी (Parbhani heavy rain) : राज्यात शुक्रवार ३० ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी वातावरण कोरडे राहणार असून त्यानंतर २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख (Punjab Dakh) यांनी दिला आहे.
शेतकर्यांसाठी डख यांनी गुरुवार २९ ऑगस्ट रोजी खास नवा अंदाज दिला आहे. त्यानुसार त्यांनी शेतकर्यांना पुढील दोन दिवसात शेतातील कामे उरकण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ऊसाला खत टाकणे, उडीद – मूग काढून घेणे सांगितले आहे. कारण राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये २ सप्टेंबर पासून (Parbhani heavy rain) मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. तो पाऊस ६ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे. या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार आहे.
जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार
सध्या जायकवाडी धरण ७० टक्के भरले असून २ ते ३ दिवसात ते ८० टक्के च्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. धरणाखाली असलेले दहा ते बारा बंधारे या मुसळधार पावसाने भरणार आहेत. मराठवाड्यात पावसाचे (Parbhani heavy rain) प्रमाण जास्त असणार आहे. यामुळे माजलगावच्या धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यासह परभणी जिल्ह्यातील दुधना, कसुरा, लेंडी नदीला पूर येणार आहे. त्यामुळे शेतकरी, नागरीकांनी पाऊस, विजेच्या धोक्यापासून स्वत: ची काळजी घ्यावी. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असून ऑक्टोबर महिन्यात त्यापेक्षा जास्त पाऊस असेल. यावर्षी थंडीला सुरुवात ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलांमुळे वेळोवेळी अंदाज देण्यात येतील, असेही यावेळी पंजाब डख (Punjab Dakh) यांनी सांगितले.