पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
परभणी/गंगाखेड (Parbhani Heavy Rain ) : चालू वर्षीच्या पावसाळी हंगामात जुलै महिन्यात झालेल्या संततधार ढग फुटी सदृश्य पावसामुळे (Heavy Rain) तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील पट्टा जलमय झाला असून उभी पिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाल्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांतुन केली जात आहे.
शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान
तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात चालू वर्षीच्या पावसाळी (Heavy Rain) हंगामात दि. १ जुलै ते दि. २० जुलै दरम्यान संततधार पावसात कुठे ढग फुटी सदृश्य तर कुठे अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील मैराळसावंगी ते मसला या गावापर्यंत येणाऱ्या गोदावरी नदीच्या पट्ट्यातील धारासुर, मैराळसावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, ब्रम्हनाथवाडी, सुनेगाव, सायळा, महातपुरी, मुळी, दुस्सलगाव, धारखेड, भांबरवाडी, गंगाखेड, झोला, पिंप्री, नागठाणा, मसला आदी गावांच्या शिवारातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून जाण्याबरोबर बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतात जागोजागी पाण्याचे तळे साचल्याने खरीप हंगामाची पेरणी झालेली शेती पूर्णपणे जलमय (Heavy Rain) होऊन शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग आदी प्रकारची उभी पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी होऊन या पिकांवर मररोग पडल्याने करपून जात आहे.
यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रशासनाने तात्काळ या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मसला येथील सरपंच रेणुका शिंदे, भगवान शिंदे, शिवाजीराव शिंदे, वैजनाथ शिंदे, आप्पाराव कदम, त्र्यंबक शिंदे, विष्णुकांत शिंदे, बालासाहेब शिंदे, धारासुर येथील पुरुषोत्तम कदम, बाळु जाधव, संतोष जाधव, विठ्ठल जाधव, महादेव जाधव, मैराळसावंगी येथील शिवाजीराव जाधव, चिंतामणी जाधव, अंकुश जाधव, अविनाश जाधव, संतोष जाधव, सखाराम जाधव, रमेश जाधव, अनंता जाधव, गौंडगाव येथील सिध्देश्वर जाधव, माऊली जाधव, काशिनाथ जाधव, रामचंद्र कराळे, दिलीप जाधव, योगेश जाधव, ओमप्रकाश कराळे, चिंचटाकळी येथील रामप्रभू मोरे, सुलभा सुभाष मोरे, शंकरराव मोरे, ओमप्रकाश मोरे, भास्कर मोरे, सचिन मोरे, मथुरा शंकरराव मोरे, मंगल भास्कर मोरे, खळी येथील ओंकार पवार, दादासाहेब पवार, प्रदिप गौरशेटे आदींसह वरील गावातील शेतकरी बांधवांनी केली आहे.