राजकीय नेते, लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
परभणी (Parbhani Heavy Rain) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करत तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधींनी परभणी जिल्ह्याला भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट
परभणी : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी राकाँ. शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आणि शिष्टमंडळाने कृषी मंत्र्यांची भेट घेत हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. त्याच प्रमाणे परभणी महापालिकेसाठी वनामकृवित जागा उपलब्ध करुन देण्याचे सांगितले.
जोड परळी ते उखळी रस्त्याचे डांबरीकरण करावे
परभणी : करपरा नदीला पूर (Heavy Rain) आल्यानंतर गावाचा संपर्क तुटत असल्यामुळे जोड परळी ते उखळी या तीन किमी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, सुभाष काळे, तानाजी दशरथे, सुरेश काळे, हरीपाल काळे, विठ्ठल काळे, राज काळे, अनिल देशमुख, विजयकुमार झाडे, बळीराम जावळे, सतीश काळे, अंकुश काळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करावा
परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेत जमीन वाहून गेली आहे. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर अशोक हाके, ज्ञानोबा ताटे, बापूराव कांडे, दत्तात्रय कुलकर्णी, विष्णू सायगुंडे, वर्षा ढाले, मुंजाजी कणे, बालिका सुरनर, पूजा मोरे, अॅड. हनुमंत सोमवंशी यांच्या स्वाक्षर्या आहेत.
पुरग्रस्तांना शासकीय मदत द्यावी
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील डॉ. एपीजे. अब्दुल कलाम नगर, सुभेदार नगर या वसाहतीमध्ये पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले. या भागातील नागरीकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनावर शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे, सादिक अली, हिदायत खान, शेख आवेज, शेख गौस, शेख राजेख, शेख नासेर, शेख शमशु, शेख बिलाल, शेख आयाज, शेख तबरेज, अमजद अली, शेख सादेक, शेख रियाज आदींच्या स्वाक्षर्या आहेत. अतिवृष्टीमुळे परभणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसह घरातील साहित्याचे (Heavy Rain) नुकसान झाल्याने नुकसानी भरपाईची मागणी होत आहे.