परभणी (Parbhani heavy rain) : मानवत तालुक्यातील सारंगपूर ते मंगरुळ रस्ता सोमवार १० जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडली आहे. हा (Parbhani Road) रस्ता बनवून एक वर्ष सुध्दा पुर्ण झालेले नाही. तसेच रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरीकांची गैरसोय होत आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील सारंगपूर ते रामपुरी या रस्त्यावरील सारंगपूर गावापासून दोन किलोमिटरच्या अंतरावर अंदाजे पंधरा फुट डांबरी रस्ता (heavy rain) मुसळधार पावसात वाहून गेला आहे.
रस्ता बनवून एक वर्ष सुध्दा झाले नाही
सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसात नवीन करण्यात आलेला (Parbhani Road) रस्ता एक वर्ष पुर्ण होण्याअगोदर पावसात वाहून गेल्याने कामाच्या दर्जाची प्रचिती येते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडली आहे. खरे तर सदरील वाहुन गेलेल्या ठिकाणाजवळ नवीन पुल बनविणे गरजेचे होते. मात्र जुन्याच पुलावर हा रस्ता करण्यात आला. तसेच नवीन बनविलेल्या रस्त्याची जाडी खुप कमी असल्याने या पहिल्याच पावसात खचून वाहून गेल्याचे निदर्शनास आले. एकाच पावसाने झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे पाहून केलेल्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने मंगरुळ, सारंगपूर, वांगी, थार, रामपुरी आदी गावांचे हाल होत आहेत. याकडे संबंधित प्रशासन तातडीने लक्ष देऊन झालेल्या घटनेची दखल घेत काही कार्यवाही करणार का हे पाहणे गरजेचे आहे.
वाहतुकीसाठी बंद झाल्याने होत आहेत हाल
सारंगपूर ते मंगरुळ रस्त्यावरील (Parbhani Road) सोमवारी झालेल्या पावसात पुल वाहून गेल्याने ग्रामस्थांची रस्ता बंद झाल्याने गैरसोय होत आहे. या रस्त्याचे काम पुर्ण होऊन एक वर्ष सुध्दा झाले नाही. त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा या घटनेमुळे लक्षात येईल.
– विठ्ठल चोखट, नागरीक, सारंगपूर