सावंगी भांबळे (Parbhani heavy rain) : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व परिसरात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास (heavy rain) मुसळधार पाऊस झाला सलग एक तास चालू असलेल्या पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक ओढ्यांना पूर आले. सलग एक तास चालू असलेल्या पावसाने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पेरणी (Agriculture) योग्य पाऊस झाल्यामुळे आनंद झाला.
अंकलगाव वरील ओढ्याला पूर आल्याने एक तास वाहतूक ठप्प
जिंतूर बामणी दरम्यान असलेल्या अंगलगाव जवळील ओढ्याला पूर आल्याने तब्बल एक तास वाहतूक गप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. पुलाचे काम करावे-जिंतूर ते बामणी दरम्यान असलेल्या पूलावर दरवर्षी (heavy rain) पावसाळ्यात हीच परिस्थिती असते कधी कधी त्या ठिकाणी रुग्णांना पण ओड्याला पूर आल्यास एक दोन तास प्रतीक्षा करावी लागते. सदरील पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी उंच फुलाचे काम करावे, अशी कुजबूज त्या ठिकाणी थांबलेल्या प्रवाशांकडून ऐकायला मिळाली.