परभणी(Parbhani):- जिल्हा बँकेचे संचालक आ. बाबाजानी दुर्राणी यांचे संचालक पद उच्च न्यायालयाने(High Courts) तुर्त कायम ठेवले आहे. याबाबत गुरूवार २५ जुलै रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत.
आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे जिल्हा बँक संचालक पद कायम
हिंगोली व परभणी या दोन जिल्ह्यांची बँक असलेल्या दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Cooperative Bank) संचालक पदाच्या निवडणुकीत आ.तान्हाजी मुटकुळे व बाबाजानी दुर्राणी हे दोघे निवडूण आले होते. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते स्वराजसिंह परिहार यांनी २४ मे २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकाकडे एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आ. दुर्राणी यांचे सदस्यत्व गैर असल्याचे सांगण्यात आले होते. आ. दुर्राणी संचालक असलेल्या संस्थेकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असताना आ. दुर्राणी जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडुन गेल्याची स्वराजसिंह परिहार यांचे म्हणने होते. या तक्रारीवरून विभागीय सहनिबंध-कांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी आ. दुर्राणी यांचे सदस्यत्व रद्द केले होते. विभागीय निबंधकाच्या या निर्णया विरुध्द आ.मुटकुळे यांनी सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली होती. या प्रकरणात सहकार मंत्र्यांनी १५ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगीती देऊन आ. दुर्राणी यांचे सदस्य पद बहाल केले होते.
आ. दुर्राणी यांनी याबाबत सहकार विभागाकडे पुनरिक्षण अर्ज दाखल
आ. दुर्राणी यांनी याबाबत सहकार विभागाकडे(Cooperative Division) पुनरिक्षण अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अमान्य करून अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागीय सह निबंधकांच्या आदेशाला दिलेली स्थगिती उठविली होती. या निर्णया विरोधात दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने विभागीय निबंधकांचे मूळ आदेश व ते कायम करण्याचे अप्पर मुख्य सचिवांचे आदेश अशा दोन्ही आदेशांना स्थगिती दिली आहे. यामुळे आ. बाबाजानी दुर्राणी यांचे संचालक पद तुर्त बहाल झाले आहे.