परभणी/दैठणा(Parbhani):- परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू (Death) झाला. तर दुसर्या जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागुन धडक
राजेभाऊ बोचरे वय ४५ वर्ष, रा. कोथाळा ता सोनपेठ, असे मृतकाचे नाव आहे. तर माधवराव नारायण धोंडगे हे अपघातात (Accident)जखमी झाले आहेत. एम.एच. २२ ए.व्ही. ८४६९ या दुचाकीवरुन येत असताना दैठणा येथे महाराणा प्रताप चौकात उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागुन धडक बसली. यात राजेभाऊ बोचरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू (Death)झाला. तर माधवराव धोंडगे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाने सर्व्हिस रोडवर ट्रॅक्टर न लावता रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर उभा करुन चहा पिण्यासाठी गेला होता.
अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी
ट्रॉलीला रेडियम नव्हते त्यात रस्त्यावर अंधार असल्याने अपघात घडला. मयत राजेभाऊ बोचरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. कोथाळा येथील स्मशानभुमीत (cemetery) अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. सदर ठिकाणी अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.