परभणीतील वसमत रोड, पाथरी रोडवरील अनाधिकृत होर्डिंग काढल्या
परभणी (Parbhani hoarding) : शहर महापालिकेने (Municipal Corporation) शहरातील अनाधिकृत होर्डिंग (hoarding) काढण्यासाठी आजपासून विशेष मोहिम सुरू केली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत वसमत रोड आणि पाथरी रोड भागातील सहा होर्डिंग काढण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात जमिनीवर उभारलेल्या होर्डिंग काढण्यात येत आहेत. दुसर्या टप्प्यामध्ये इमारतीवरील होर्डिंग काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
महापालिकेने गुरुवार सकाळ पासून हाती घेतली मोहिम
मुंबई येथे होर्डिंग कोसळून झालेल्या (Mumbai Hoarding accident) अपघातानंतर अनाधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुढे आला. परभणी शहरातही १२९ अनाधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंग मालकांना मनपाने नोटीस दिल्या होत्या. गुरुवार पासून होर्डिंग काढण्याचे काम हाती घेण्यात आले. मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुरा, न्यायरत्न घुगे, कुणाल भारसाकळे, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड यांच्या पथकाने जमीनीवरील होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे. वसमत रोडवरील दोन आणि पाथरी रोडवरील चार होर्डिंग काढण्यात आल्या आहेत. इमारती वरील (Unauthorized hoarding) होर्डिंगही काढण्यात येणार आहेत. या बाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. होर्डिंग न काढल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.