नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयात गोंधळ
जिंतूर (Parbhani hospital) : परभणीच्या जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका 26 वर्षीय तरुणाचा डॉक्टरांचा हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात ठेऊन गोंधळ घातला यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीचा अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ही घटना दिनांक 25 जुलै रोजी घडली आहे
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणार तरुण राजरत्न कैलास वाकळे वय 26 वर्ष यास मागील दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या उपचार सुरू केले होते मात्र त्या तरुणाचा ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते.
यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता म्हणून नातेवाईकांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्या समोर ठेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात घेऊन गेले होते यावेळी शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला यावेळी खाजगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी मोठा जमाव जमला होता दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला होता