बाहेरराज्यातील टीमने केली तपासणी
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani Hospital) : एनक्यूएएस हा रुग्णालयांना दिला जाणाऱ्या महत्त्वपूर्ण बहुमाना करीता (Parbhani Hospital) परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात नुकतेच बाहेर राज्यातील चमूने तपासणी करीत मूल्यांकन केले असून सदरील तपासणी अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. (NQS Evaluation) एनक्यूएएस हा रुग्णालयांना दिला जाणारा महत्त्वाचा बहुमान असून नामांकन प्राप्त झालेल्या रुग्णालयांना शासनाकडून विविध सवलती आणि मोठ्या प्रमाणात अतिरिक्त निधी प्राप्त होत असतो. (Parbhani Hospital) परभणी जिल्हा रुग्णालयाचे नुकतेच (NQS Evaluation) एनक्युएएस मूल्यांकन तेलंगणातील डॉक्टरांच्या चमूने अंतर्गत व बाह्य मूल्यांकन केले.
यावेळी तेलंगणातील राजेश कुमार यांनी जिल्हा रुग्णालयाचे बाह्य मूल्यांकन केले. रुग्णालयाचे अंतर्गत मूल्यांकन डॉ. तपासे यांनी जलद (NQS Evaluation) एनक्युएएस मूल्यांकन केले. ज्यात रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णांचे समाधान, (Parbhani Hospital) रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी सुविधा याची पाहणी टीमच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सारिका बडे, डॉ. कल्याण कदम , डॉ. किशोर सुरवसे, डॉ. मीना देशमुख, अधीपरीचारिका, नर्सिंग कर्मचारी, सर्व तांत्रिक कर्मचारी, यांची उपस्थिती होती. यावेळी (Parbhani District) जिल्हा रुग्णालयाच्या टीमने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल बाहेर राज्यातील चमूने व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.