परभणीतील राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, सोयी – सुविधा मिळत नसल्याची तक्रार
परभणी (Parbhani Health care) : वैद्यकीय अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र (Parbhani Health care) राणीसावरगाव येथे रुग्णांना वेळेवर उपचार आणि सोयी – सुविधा मिळत नसल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १५ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी सौ. शुभांगी हरीभाऊ दुबे या रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास सांगत आहेत. यामुळे रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. त्या आपल्या घरातून आरोग्य केंद्राचा कारभार चालवत असल्याचे दिसत आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्य अधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर ओंकार आंधळे, माऊली जाधव, रावसाहेब फुगनर, संभाजी हाके, बंडू पुजारी, संतोष आंधळे, खय्युम पठाण, राम माने, माधव जाधव, शिवाजी हाके, राम जाधव, सुभाष राठोड, वसंत चव्हाण, मारोती गाडे, गंगाधर राठोड, नारायण कुंडगीर यांच्या स्वाक्षर्या आहेत.
राणीसावरगाव ग्रा.पं. ने घेतला ठराव
राणीसावरगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांची बदली करुन नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्ती बाबत ग्रामपंचायतीने एप्रिल २०२३ मध्ये ठराव घेतला होता. महिला वैद्यकीय अधिकारी बरोबर सेवा देत नसल्याने सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या जागी नवीन वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे सर्वानुमते ठरल्याचे ठरावात नमुद करण्यात आले आहे.