आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग; मिळवले ७२ गुण
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani Hospital) : आरोग्य निर्देशांका नुसार राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मासिक रँकिंग दिल जाते. मासिक रँकिंगमध्ये ऑक्टोबर २०२४ नंतर सलग नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा १०० पैकी ७२ गुण मिळवत शुक्रवार २४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या यादीत परभणी जिल्हा रुग्णालय दुसऱ्यांदा राज्यात अव्वल ठरले आहे.
राज्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिनस्त (Parbhani Hospital) आरोग्य संस्थेकडून आरोग्य सेवा दिल्या जातात. सदर आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी निर्देशांक निश्चित केले आहेत.आरोग्य सेवेच्या अद्यावत परिस्थितीचे जिल्ह्यांना आकलन व्हावे याकरिता राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय (१०० खाटा) यांचे दरमहा रँकिंग करण्याचे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी आदेशित केले आहे. त्यानुसार मार्च २०२४ पासून रँकिंग करण्यात येते. ज्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये ७२ गुण मिळवत परभणी जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल ठरले होते. त्यानंतरच्या नोव्हेंबर २०२४ च्या रँकिंग मध्येही सलग ७२ गुण मिळवत दुसऱ्यांदा मासिक रँकिंगमध्ये परभणी जिल्हा रुग्णालय अव्वल स्थानी आले आहे.
यापुढेही मासिक रँकिंग मध्ये प्रथम स्थानावर राहण्याचा प्रयत्न
परभणी जिल्हा रुग्णालय (Parbhani Hospital) ऑक्टोबर २४ नंतर नोव्हेंबर २४ मध्येही सलग दुसऱ्यांदा ७२ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थानी आला आहे.. यापुढेही रुग्णांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्याचा मानस असून या पुढील मासिक रँकिंग मध्येही (Parbhani Hospital) परभणी जिल्हा रुग्णालय प्रथम स्थानी राहील असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार व अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले..