दगडफेक प्रकरणामागची चौकशी करण्याची मागणी; संविधान विटंबनेचा निषेध
परभणी (MLA Meghna Bordikar) : संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेली घटना ही निषेधार्थ आहे. बंद शांततेत चालू असताना दुपारनंतरच काही जमावाने दगडफेक व जाळपोळ केली. त्यांना उचकविण्याचे काम केले गेले आहे. खा. बंडू जाधव व खा. फौजिया खान यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओ नंतर परभणीत तणाव वाढला असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar) यांनी केला आहे.
परभणी शहरातील अतिथी हॉटेलवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar) या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाले की, परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी जनतेकडून रोष व्यक्त होणे साहजिक आहे. कारण देश हा संविधानावर चालत असून आम्ही सर्व संविधानाचा सन्मान करतोत. त्यामुळे दुसर्या दिवशी बंद हा कडकडीत पाळला जात होता. दुपारी बारा वाजेपर्यंत शांततेमध्ये जिल्हाभरात निषेध चालू होता.
दुपारी बारानंतर अचानकच परभणी शहरातील जमावणे मुख्य रस्त्याने जाऊन बाजारपेठेमध्ये दगडफेक व गाड्यांची तोडफोड केली. या जमावाला उचकाविण्याचे काम कोणीतरी केले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी पोलिसांमार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण ज्या दिवशी विटंबना झाली त्या दिवशी कोणताच लोकप्रतिनिधी बोलला नाही, दुसर्या दिवशी वातावरण बिघडविण्यासाठी काहींनी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दगडफेकी मागे कोणीतरी मास्टरमाईंड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंदू समाजाचा मोर्चा निघाल्यानंतरच हा प्रकार का घडला व हिंदू मोर्चाला बदनाम करण्यासाठी हे सर्व षडयंत्र केले गेले जात आहे. या घटनेचे राजकारण केले जात आहे. तेव्हा खा. जाधव व खा. खान यांनी कोणत्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला व ते कोणाशी बोलले याबद्दल चौकशी होणे देखील गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. व्यापार्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे आ. मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar) यांनी सांगितले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, सुनील देशमुख, डॉ. केदार खटिंग, बाळासाहेब भालेराव, बंडू बनसोडे, मंगला मुदगलकर, मुकिंद खिल्लारे आदींची उपस्थित होती.