परभणी (Parbhani) :- भूमिअभिलेख प्रशासनाच्या (Land Records Administration) बेजबाबदार पणामुळे शहरवासीयांना जाणीव पूर्वक पी.आर.कार्डपासून वंचित ठेऊन कार्ड दुरूस्तीसह इतर प्रकरणे प्रलंबीत आहेत. प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्रास लाचेची मागणी केल्या जात आहे. या विरोधात ११ फेब्रुवारी रोजी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य नागरीक मालमत्ता खरेदी करून भविष्यासाठी गुंतवणूक करतात. आज घडीला शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.
शहर व नवीन होणार्या वसतीमध्ये अद्यापही पी.आर.कार्ड उपलब्ध
परभणी शहर व नवीन होणार्या वसतीमध्ये अद्यापही पी.आर.कार्ड उपलब्ध करून देण्यात आले नाही. टोच नकाशा, टिप्पन, आलेख, चौकशी नक्कल, जमीन मोजणी, पी.आर.कार्ड दुरूस्ती, क्षेत्रफळ दुरूस्ती इत्यादी कामे करण्यात येत आहे. बेकायदेशिरपणे काम केल्या जात आहे. याचा निषेध करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे संदिप सोळूंके, सय्यद अजहर, महीप रेवणवार, शेख मोहसीन, शेख असद, शैलेश निर्वळ, राजकुमार बोचरे, गंगाधर यादव, हिंमत खिल्लारे, सतिश मस्के, सुरज अहिरे, रिजवान पटेल, सचिन गारूडी, मितेश सुकरे, प्रसाद गोरे, शिराज खान यांची उपस्थिती होती.