परभणी (Parbhani) :- जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावणार आहे. तेंव्हा जायकवाडी धरणातून नियमानुसार बाराशे क्यूसेसने पाणी सोडण्याची प्रमुख मागणी घेऊन जायकवाडी पाटबंधारे विभाग (Irrigation Department) क्रमांक दोन या कार्यालयाला घेराव घालून टाळे ठोकण्याचा इशारा उबाठाचे खा.संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पिकांसाठी बाराशे क्युसेसने पाणी सोडा
पत्रकार परिषदेला (Press conference) कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, संजय सारणीकर व इतर उपस्थित होते. पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले, जिल्ह्यात जायकवाडी धरणातून येणारे पाणी शेतकर्यांना कमी प्रमाणात मिळत आहे. काही भागात पाणी पोहोचत नसल्यामुळे शेतकर्यांचे पिके धोक्यात आले असून येणार्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. सध्या पाणी सोडण्यात आले असून शेवटच्या शेतकर्यापर्यंत पाणी जाणे अपेक्षित असताना पाणी पाथरीच्या पुढे सरकत नसल्याचे समोर येत आहे. त्याचे कारण पाणी ८०० क्युसेसने सोडण्यात आले आहे. ते पाणी १२०० क्युसेसने सोडणे गरजेचे आहे. तेंव्हा टेल पर्यंत पाणी पोहोचू शकते. पाणी सोडल्यानंतर काही लोकांनी आपले बॅरेजेस भरायला सुरुवात केली आहे. एक वेळा भरला तर ठीक आहे, परंतु प्रत्येक वेळी पाणी सोडल्यानंतर बॅरीजेस भरून घेतले जात आहेत. यामुळे हजारो शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचे समोर येत आहे.
पाणी बाराशे क्यूसेसने सोडण्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना बोलल्यानंतरही आमच्या मागणीकडे ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सोमवार १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन या कार्यालयाला घेराव घालून टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होणार आहेत. वेळीच प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशारा खा. जाधव यांनी दिला आहे.