परभणी (Parbhani) :- बस मध्ये चढत असतांना महिला प्रवाशाजवळील १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे दागिणे लंपास करण्यात आले. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता परभणीतील बसस्थानकात (Bus stand)घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिणे लंपास केले. या प्रकरणी १२ फेब्रुवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात(Police station) गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी शहराच्या बसस्थानकातील घटना अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल ..!
सौ.संध्या अर्धापूरकर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या बहिणीसोबत गंगाखेडला जाण्यासाठी कळमनुरी येथून परभणी बसस्थानकात आल्या. या ठिकाणी पुणे – गंगाखेड या बसमध्ये बसल्या. यावेळी त्यांना त्यांच्या जवळील पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. पर्समध्ये ठेवलेले दागिणे दिसले नाही. चोरट्यांनी सोन्याचे १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे दागिणे चोरून नेले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि.केंद्रे करत आहेत.