घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या मोर्चात हजारो महिला, पुरुष सहभागी ..!
परभणी (Parbhani justice March) : शहरातील मातंग समाजाच्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर २३ फेब्रुवारी रोजी गुंडांनी बलात्कार केला आहे. परंतु पोलिसांनी केवळ दोनच गुंडांना आरोपी केले आहे. इतर गुंडांना आरोपी करण्याची कारवाई जवळपास थांबलेली आहे. सदरील खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत सोमवार १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर (Parbhani justice March) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष सहभागी झाले होते.
सकाळी ११ वाजता लहूजी नगर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोठा मारोती, शाही मस्जिद मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पुण्यात घडलेली घटना जितकी संतापजनक आहे, त्यापेक्षा कैक पटीनं संतापजनक घटना परभणीतील असतांना देखील त्याकडे सगळीकडून दुर्लक्ष होत आहे. कारण ही बालिका लहुजी नगरातील आहे म्हणून का? ती मुलगी भंगार वेचणारी आहे म्हणून टाकून देणार आहोत का? असा प्रश्न उपस्थित करुन परभणी येथील बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (Parbhani justice March) सदर प्रकरण जलदगती न्यायालयात का चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, घटनेतील उर्वरित गुंडांना गुन्ह्यात घ्यावे, आरोपींची नार्को टेस्ट करावी, पिडीत परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये मदत देवून परिवाराचे पुनर्वसन करावे आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन
मोर्चात कॉ.गणपत भिसे, उत्तम गोरे, माऊली साळवे, एल. डी. कदम, अशोक शिंदे, पप्पू वाघमारे, संजय लोखंडे, नागेश खंदारे, किशोर कांबळे, संजय शिंदे, जनार्धन बारसे, कार्तिक साळवे, प्रतिक बोराडे, लखन भांगे, गंगाधर भांगे, शाम गवारे, सुनिल शिंदे, कारभारी कांबळे, अविनाश मोरे, कुणाल गायकवाड, के.के. भारसाखळे, अशोक उबाळे, संदीप हिवाळे आदींसह हजारो महिला, पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. (Parbhani justice March) सदरील घटना अतिशय निंदनिय आणि संतापजनक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.




