शिवभक्त मोठया संख्येने सहभागी होणार
परभणी (Parbhani Kavad Yatra) : शहरातील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच परभणी शहरात सोमवार ५ ऑगस्ट रोजी भव्य (Kavad Yatra) कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कावड यात्रा श्रीक्षेत्र त्रिधारा येथून मृत्यूंजय पारदेश्वर महादेव मंदिरापर्यंत निघणार आहे. यामध्ये मोठया संख्येने शिवभक्त सहभागी होणार आहेत. शहरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागातून शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी होणार आहेत.
सोमवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदी पात्राचे विधीवत पुजन करून भाविक नदीवर (Kavad Yatra) कावड भरण्यासाठी रवाना होतील. ही शोभायात्रा ८.३० वाजता कावड भरून दुपार पर्यंत परभणी शहरात दाखल होतील. विविध पथकासह शिवभक्त भक्तीमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नारायण चाळ, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पारदेश्वर मंदिराजवळ सायंकाळी दाखल होईल. व तेथे भारतातील सर्वात मोठे मृत्यूंजय पारदेश्वर शिवलिंगाचा अभिषेक करून यात्रेचा समारोप होईल. यामध्ये शिवभक्तांनी मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आनंद भरोसे (Anand Bharose) व संजिवनी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.