आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यादाचा कावडयात्रा
परभणी (Parbhani Kavad Yatra) : शहरातील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने भाजपा विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच परभणी शहरात सोमवार ५ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रा (Kavad Yatra) काढण्यात आली. श्रीक्षेत्र त्रिधारा येथून कावड यात्रेला प्रारंभ झाला. वसमत रोडमार्गे निघालेल्या कावडयात्रेत शिवभक्त मोठ्यासंख्येने सहभागी झाले. श्रीक्षेत्र त्रिधारा येथून सकाळी ९ वाजता श्रावण मासातील पहिल्या सोमवारी कावड यात्रेला सुरुवात झाली. श्रीक्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदी पात्राचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर कावडयात्रेला सुरुवात झाली.
संजीवनी मित्र मंडळाचा उपक्रम
परभणी शहरात यात्रा दाखल होताच ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येत होते. विविध पथकासह शिवभक्त भक्तीमय वातावरणात खानापूर फाटा, वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नारायण चाळ मार्गे अष्टभूजीदेवी मंदिर, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सहा वाजता यात्रा आली. भारतातील सर्वात मोठे मृत्यूंजय पारदेश्वर मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करून यात्रेचा समारोप होईल. दरम्यान (Kavad Yatra) कावडयात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला. सायंकाळी उशीरापर्यंत कावडयात्रा सुरु होती. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.