परभणी जिल्ह्याला आमदार मिळणार
परभणी (Parbhani Legislative Council) : लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकर (Rajesh Whitekar) यांच्या जागेवर महादेव जानकर यांना महायुतीने उमेदवारी दिली. या त्यागाच्या बदल्यात विधानपरिषदेवर त्यांना घेणार असल्याचे अप्रत्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. सोमवारी मुंबई येथे राजेश विटेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २ जुलै मंगळवार रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
परभणी जिल्ह्याच्या (Parbhani district) राजकारणात एक नवीन कलाटणी मिळणार आहे. तरुण तडफदार जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर (Rajesh Whitekar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची घोषणा झाली आहे. महायुतीच्या कोट्यातून त्यांना ही उमेदवारी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Legislative Council Election) प्रचारादरम्यानच महायुतीच्या सभांमध्ये राजेश विटेकरांना सहा महिन्यात न्याय देऊ असे सांगितले गेले. (Rajesh Whitekar) विटेकरांनी जानकरांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून विटेकरांना विधानपरिषदेवर घेण्याचा दिलेला शब्द पाळला जात आहे. विटेकरांची विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. तरुण आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा झाल्यानंतर जिल्ह्यात निश्चितच पक्षाला बळ मिळणार आहे.