परभणी (Parbhani) :- ग्रामपंचायत देवगावफाटा यांची कुठल्याही प्रकारची संमती न घेता सार्वजनिक वर्दळ व विद्यार्थ्यांसाठी ये – जा करण्याच्या असलेल्या रस्त्यावर वॉईन बारचे दुकान सुरु करण्यात आले आहे. सदर बारचा परवाना (Bar license) रद्द करावा अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय देवगावफाटा ता. सेलु यांच्या वतीने निवेदनामार्फत जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
बारचा परवाना तातडीने रद्द करावा अन्यथा सामुहिक रास्तारोको
देवगावफाटा येथे मोठ्या संख्येने प्रवाशी, विद्यार्थी उपस्थितीत राहतात. या ठिकाणी १० एप्रिल पासून बार सुरु करण्यात आले आहेत. प्रवाशांचे ठिकाण बार पासुन ३५ फुट अंतरावर आहे. बारचे दुकान सामाजीक सौहार्द, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अपायकारक आहे. बारला ग्रामपंचायतची परवानगी(allowed) नाही. बनावाबनवी करुन कागदपत्र काढत बार टाकण्यात आले आहे. मुख्य मार्गावरील सदर बारचा परवाना तातडीने रद्द करावा अन्यथा सामुहिक रास्तारोको, आंदोलन करण्याची दिशा ग्रामस्थांना ठरवावी लागेल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.




