परभणी (Parbhani):- स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० च्या सुमारास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते निरज हॉटेलकडे येणार्या रस्त्यावर कारवाई करत एक अॅटो ताब्यात घेतला. सदर वाहनामध्ये ८१ हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू(Domestic and foreign liquor) होती. अॅटोसह या कार्यवाहीत २ लाख ३१ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते
स्थागुशाचे सपोनि भारती, पोउपनि परिहार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, रवी जाधव, शेख रफिक, निलेश परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला एक ईसम अॅटोमधून देशी-विदेशी दारु घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी एमएच २२ ए.पी.२०४३ या क्रमांकांचा अॅटो ताब्यात घेतला. सदर अॅटोमध्ये ८१ हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू मिळून आली या प्रकरणी नजीर नुर शेख, शेख शगीर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहे.