चोरीचा नवा फंडा गुंगीचे इंजेक्शन देत पशुधन चोरणारी टोळी परभणीत सक्रीय
परभणी (Parbhani livestock theft) : चारचाकी वाहनात बसुन आलेल्या चोरट्यांनी पशुधनाला गुंगीचे इंजेक्शन देत जनावरे चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना १ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ३० हजार रूपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे. या (livestock theft) प्रकरणी कोतवाली पोलीसात अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील अशीच घटना गंगाखेड शहरात घडली होती. पशुधन चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, शेख शफीयोद्दीन यांनी तक्रार दिली आहे. चारचाकी वाहनामधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी व गजानन राऊत, शेख सोफियान यांचे (livestock theft) पशुधन चोरी करण्याचा प्रयत्न गंगाखेड नाका परिसरात केला. चोरट्यांनी उत्तम कदम, परमेश्वर जाधव, शय्यद निसार यांच्या मालकीचे ३० हजार रूपये किंमतीचे पशुधन लंपास केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. पोपलवार करत आहेत.