पाथरी विधानसभा 63.44 टक्के
गंगाखेड विधानसभेत 62.02 टक्के सर्वाधिक मतदान
जिंतूर विधानसभा मतदार संघात 55.17 टक्के सर्वात कमी मतदान
परभणी (Parbhani) : लोकसभा सार्वत्रिक (LokSabha Election) निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी दि.26 एप्रिल शुक्रवार रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. यात सरासरी अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हा माहिती कार्यालया मार्फत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
परभणी लोकसभा (Parbhani lokSabha) सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रावर शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये 95 जिंतूर विधानसभा मतदार संघात 55.17 टक्के, परभणी 60.07 टक्के, गंगाखेड 62.02 टक्के, 98 पाथरी 63.44 टक्के, 99 परतुर 59.42 टक्के आणि 100 घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.09 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. (Parbhani lokSabha) परभणी लोकसभा मतदार संघात सरासरी अंदाजे 60.09 टक्के मतदान झाले आहे.
परभणी लोकसभा (Parbhani lokSabha) मतदार संघातील सहा (Assembly constituency) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँग रुम्समध्ये सुरक्षीतरित्या आणण्यात आल्या आहेत. सर्व मतदान यंत्रे आयोगाचे निरिक्षक, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि (Parbhani Election) उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सिल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.