परभणी (National Kabaddi Tournament) : परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन व युनिटी फाऊंडेशन परिवारातील अष्टपैलू कबड्डी खेळाडू ऋषिकेश बन्सीधरराव कदम व गोविंद गणेशराव जाधव यांची ७ व्या खेलो इंडिया युथ गेम्स – २०२५, बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली आहे. या (National Kabaddi Tournament) गौरवपूर्ण यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या उल्लेखनीय निवडीबद्दल (National Kabaddi Tournament) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी मा. साखरे मॅडम, परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आ. सुरेशराव वरपुडकर साहेब, सचिव व राज्य असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे सर, तसेच संजय मुंडे सर, प्रा. चंद्रकांत सातपुते सर, डॉ. माधव शेजूळ सर, माधव शिंदे सर, हिंगोली जिल्हा असोसिएशनचे लोखंडे सर व युनिटी फाऊंडेशन परिवारातील गोविंद अवचार, सुनील शिंदे, सूर्यकांत सातपुते, .भरतराव घांडगे, परमेश्वर जाधव, योगेश आदमाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या (National Kabaddi Tournament) निवडीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्याची संधी मिळत असून, यामध्ये सर्व गुरुवर्य, प्रशिक्षक, कबड्डीप्रेमी आणि सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
