परभणी/जिंतूर (Parbhani mahavitaran) : शहर व परिसरात महावितरण (Parbhani mahavitaran) कर्मचाऱ्यांच्या काम काढू धोरणामुळे सातत्याने दिवसा व रात्री अनेकवेळा विजेचा लपंडाव होत असल्यामुळे विज ग्राहकांना प्रचंड प्रमाणात असाह्य वेदना होत असून दोन कार्यालय वगळता आजघडीला चार कार्यालयांमध्ये अधिकारीच नसल्यामुळे कर्मचारी शहरवासीयांना निकृष्ट विजसेवा (Power supply) पुरवत असल्याने जिंतूरकर अक्षरशः वैतागले आहे. म्हणून या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
महावितरणच्या निकृष्ट विजसेवेला जिंतूरकर वैतागले
मार्च एंडचे निमित्त करून (mahavitaran) महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहर व परिसरात सक्तीने विजबिले वसुली केल्याने कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी वरिष्ठांनी त्यांचे गौरव केले पण मागील अनेक दिवसांपासून ह्याच कर्मचाऱ्यांच्या काम काढू धोरणामुळे शहरात बहुतांश ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडली आहे. परिणामी मागील कित्येक दिवसांपासून शहर तसेच परिसरात सातत्याने दिवसा व रात्री अनेकवेळा (Power supply) विजेचा लपंडाव सुरूच असल्याने विज ग्राहकांना नाहक असाह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.
लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
सदरील समस्येबाबत विज ग्राहक महावितरणच्या (mahavitaran) कार्यालयात गेल्यानंतर एकही जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची दाद ऐकायला कोणीच तयार नसते. महावितरणच्या या निकृष्ट सेवेमुळे जिंतूरकर अक्षरशः वैतागले आहे. शिवाय शहरात अस्वच्छता वाढल्याने डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे परिणामी (Power supply) विज पुरवठा खंडित झाल्यानंतर डासांना मोठ्या प्रमाणात खुराक मिळत आहे. म्हणून या गंभीर समस्येकडे लोकप्रतिधींनी लक्ष घालून आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.