परभणी (Parbhani Mahavitaran) : येथील विद्युत वितरण कंपनीचे (Electricity Distribution) अधीक्षक अभियंता राजाराम बापू माने (Superintending Engineer) यांची एका रात्रीतून रायगड जिल्हा पेन या ठिकाणी बदलीचे आदेश आले. कुणालाही न सांगता माने यांनी दुसर्या दिवशी पेन येथील पदभार स्वीकारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाताना अनेक कामांना मंजुरी दिली असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत असल्याने याची चौकशी होणे गरजेचे आहे.
परभणीतील वितरणचे अधीक्षक अभियंता माने रात्रीतून गायब
परभणी जिल्ह्यात अधीक्षक अभियंता म्हणून राजाराम माने यांनी पदभार घेतल्यापासून (Parbhani Mahavitaran) महावितरण कंपनीचा कारभार सुधारेल असे वाटले होते. परंतु महावितरणाच्या कार्यपद्धतीमध्ये फारसा बदल माने यांना करता आला नाही. सुरुवातीच्या काळात माने यांनी अधिकारी व कर्मचार्यांना चांगलेच धार्यावर धरले. त्यानंतर जसा जसा कार्यकाळ होत गेला त्यानंतर कार्यपद्धतीत बदल होत गेला. मर्जीतील लोकांना सांभाळून कार्यपद्धती केली जात होती असा आरोप त्यांच्यावर आहे. माने यांनी परभणी जिल्ह्याची कार्यपद्धती सुधारण्याचा प्रयत्न देखील केला पण ते अपयशी ठरले.
रायगड जिल्ह्यात बदली
कार्यकारी अभियंता (Superintending Engineer) माने यांची अचानक बदली झाली व ते रायगड जिल्ह्यातील पेन या ठिकाणी रात्रीतून जाऊन पदभार घेतला. बदलीचे आदेश केव्हा आले, कोणाला मिळाले याची माहिती तीन दिवसानंतर मिळाली. बदलीच्या गोपनीयते मागे काय कारण असेल अशी चर्चा आता (Parbhani Mahavitaran) परभणीच्या विद्युत वितरण कार्यालयात होत आहे. जाताना माने यांनी अनेक बोगस बिलांवर सही केली असल्याची चर्चा आहे. तसेच पडझड व दुरुस्तीच्या कामांना देखील मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यांच्या काळात पडझड व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर बोगस करण्यात आली आहेत. व दिलेली मंजुरी देखील बोगस लोकांनाच दिली असल्याचे बोलले जात आहे. असा प्रकार झाला असेल तर वरिष्ठ पातळीवरून याची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे.