परभणी(Parbhani) :- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल ओबीसी (OBC)समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत बुधवार १० जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला(District Administration) निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी
शिंदे समिती रद्द करावी, सगेसोयरे अध्यादेश लागु करु नये, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत, मागील वर्षभरात कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकरभरती रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह(Hostel) तात्कळ बांधावे, महाज्योतीला निधी द्यावा, पिएचडी धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लागु करावी, ओबीसी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी १३ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत दिलेल्या निवेदनावर अनिल गोरे, कृष्णा कटारे, नागेश तळेकर, प्रा. विठ्ठल तळेकर, बंडु म्हेत्रे, अंगद सोगे, सुमित जाधव, अजय तळेकर, आर.एस. काळे, अॅड. गायकवाड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.