जागतिक पर्यावरणदिनी उपक्रम
परभणी (Environment day) : आज संपूर्ण जगावर ग्लोबल वार्मिंगचे संकट ओढावले आहे. भविष्यात मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दिवसें दिवस पर्यावरणाचा होणारा र्हास वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. आपलाही यात खारीचा वाटा असावा या हेतूने (Manaswini) मनस्विनी वतीने सर्व महिलांसाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
स्पर्धकांना मोफत मिळणार झाडे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (Environment day) ही स्पर्धा घेण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पुर्तता करणार्या झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, या साठी किमान तीन किंवा त्यापेक्षा अधिक झाडे लावून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांना जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मोफत झाडे मिळणार आहे. तसेच पाथरी रोडवरील सरदेशपांडे अॅग्रो नर्सरीमध्ये मनस्विनी सदस्यांना योग्य दरात इतर झाडे मिळतील. सदस्यांना किमान तीन ते पाच झाडे घ्यावी लागणार आहेत.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे
या स्पर्धेचे उद्घाटन २३जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. २३ जून ते २३ जुलै २०२४ या कालावधीतच झाडांची लागवड करायची आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आणि आपण लागवड केलेल्या झाडांचा फोटो ९८५०२०९१७८ या क्रमांकाच्या व्हॉटस् अॅपवर दर तीन महिन्यानंतर पाठवावा. वर्षभर स्पर्धकांना झाडांचे संवर्धन करावे लागणार आहे. ५ जून २०२५ रोजी स्पर्धेचा निकाल जाहिर होईल. विजेत्या स्पर्धकांना मनस्विनी मंचकडून आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहे. तेव्हा आपली वसुंधरा सुजलाम् सुफलाम करण्यासाठी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन (Manaswini) मनस्विनी मंचच्या संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे.