आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल..
परभणी/पूर्णा(Parbhani/Poorna):- सकाळी ९ वाजुन ४१ मिनीटांची वेळ शहरातील रेल्वे स्थानकावर(Railway station) आपात्कालीन भोंग्याचा आवाज रेल्वे कर्मचा-यांची एकच धावाधाव याचवेळी जुन्या लोकोशेड परिसरात अचानक रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका रेल्वे कोचला आग लागली. तर पटरीवरील दोन डबे एकमेकांवर चढलेले दृश्य कोचमध्ये प्रवाशी अडकल्याने प्रचंड गोंधळाची परिस्थिती.
दमरेच्या नांदेड विभागाची आपत्कालीन यंत्रणा
याचवेळी स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात इतर अग्निशमन दलाचे (fire brigade) बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने प्रवाशांना देखील बाहेर काढत रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. तर हे होत रेल्वेचं (मॉकड्रील) अपघात घडल्यानंतरच प्रात्यक्षिक दरवर्षी दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) नांदेड विभाग (South Central Railway), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम कडून संयुक्त मॉकड्रील करण्यात येते.
दोन डबे रुळावरून घसरवत एक मेकांवर चढवले
यावर्षी पूर्णा लोकोशेड परिसरात हे ड्रील मंगळवारी ३० रोजी सकाळी करण्यात आले. या मॉकड्रिलमधून (Mock drill) मोठी दुर्घटना घडल्यास विविध विविध टीमसोबत सतर्कता आणि प्रतिसाद किती वेळेत मिळतो. याच पार्श्वभूमीवर कवायती घेण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची (Artificial accident) परिस्थिती निर्माण करण्यात आली. 997716 क्रमांकाचा एक डबा पेटवून दिला गेला आणि 987419, 907450 क्रमांकाचे दोन डबे रुळावरून घसरवत एक मेकांवर चढवले. कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली.
सकाळी ९;४१ वाजता ड्रिल सुरू करण्यात आली आणि लगेचच कोचला आग लागली. नांदेड विभागाच्या नियंत्रण कक्षातील क्षेत्रीय कर्मचार्यांकडून संदेश देण्यात आला. आणी बचावकार्य सुरू करण्यात आले.
नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू
दरम्यान राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF), रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला. राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) काही वेळातच या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिकाही वाजता घटनास्थळी पोहोचल्या. रेल्वेच्या आरपीएफ (Railway RPF), स्काऊट गाईड (Scout Guide) टिमने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश करून आग पूर्णपणे विझवली.डब्बाचे पत्रे कापून, खिडकी तोडून सर्व प्रवाशांना तासाभराच्या आत बाहेर काढण्याची कवायत करण्यात आली.
जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले
यावेळी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याचे दाखवण्यात आले. सर्व स्टेकहोल्डर्स (Stakeholders) प्रतिसादात्मक आणि जलद असल्याचे आढळले आणि संपूर्ण परिस्थिती 1 तासात नियंत्रित करण्यात आली. या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले आणि वास्तविक जीवनात अशा प्रात्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात मदत होईल. नांदेड विभागाचे (Nanded Division) उद्दिष्ट शून्य अपघात आणि अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्याचे आहे. अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातील. द.म.रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सुरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले.यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिन्सीपल चिफ सेफ्टी अधिकारी व्यंकटराम रेड्डी नांदेड रेल्वेच्या (Nanded Railway) विभागीय व्यवस्थापक निती सरकार, सहा व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना, एन.डी.आर.एफ विभागाचे प्रमोद राय, राहुल रघुवंशी, सुभाष अवलवार, आरोग्य विभाग प्रमुख डॉ.नाईक, सुरक्षा विभाग प्रमुख हरिकृष्ण, जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.