परभणी (Parbhani):- शहरातील १२ केंद्रावर राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ (पहिला पेपर) आणि दुपारी ३ ते ५ (दुसरा पेपर) अशा दोन सत्रात सुरळीत पार पडली. दोन्ही सत्रात जिल्ह्यातील ३ हजार ८५९ उमेदवारांनी परीक्षा (Examination)दिली. तर २ हजार ५५ उमेदवार गैरहजर (absence) राहिले.
३ हजार ९५९ परीक्षार्थी हजर ह केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त
परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय, रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, शारदा महाविद्यालय, बालविद्या मंदिर विद्यालय, नानलपेठ, शिवाजी महाविद्यालय एनव्हीएस. मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर, गांधी विद्यालय, कृषी सारथी कॉलनी, बालविद्या मंदिर हायस्कुल, वैभव नगर, भारतीय बालविद्या मंदिर, ममता कॉलनी, कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर, खानापूर फाट्याजवळ, संत तुकाराम महाविद्यालय, वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, सुपर मार्वेâट या १२ केंद्रांवर परीक्षा पार पडली. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप परीक्षा प्रमुख म्हणून निवास उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, भरारी पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, अभि रक्षक उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा पार पडली.
भरारी पथक प्रमुख जीवराज डापकर यांनी सर्व परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, प्रदीप मुनेश्वर, विकास सायगुंडे यांनी परिश्रम घेतले.