परभणीच्या गंगाखेड येथे मूक मोर्चा
परभणी/गंगाखेड (Parbhani Muk Morcha) : छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असल्याचे मत तेलंगणा राज्यातील भाजपाचे आमदार टी राजासिंग (MLA T. Raja Singh) यांनी दि. २९ ऑगस्ट गुरुवार रोजी गंगाखेड येथे आयोजित मूक मोर्चा (Parbhani Muk Morcha) नंतर झालेल्या जाहीर सभेतील उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले.
बांगलादेशातील हिंदू समाज बांधवावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनाविरुद्ध गंगाखेड येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट गुरुवार रोजी भव्य अशा विराट निषेध मुक मोर्चाचे आयोजन केले होते. तेलंगणा राज्यातील भाजपाचे आमदार टी. राजासिंग यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजेच्या सुमारास श्री बालाजी मंदिर परिसरातून निघालेला मुक मोर्चा शेटे गल्ली, पोस्ट ऑफीस, सराफा लाईन, भगवती चौक, दिलकश चौक, डॉ. हेडगेवार चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पोलीस ठाण्यासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचताच या (Parbhani Muk Morcha) मुक मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सभेला संबोधित करतांना आ. टी. राजासिंग म्हणले की भारतातीलच नव्हे तर विदेशातील हिंदुवर अत्याचार होत असतील तर त्या विरुद्ध आवाज उठविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगत महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असल्याने महाराष्ट्र राज्यात असलेल्या बांगलादेशी विचारसरणीच्या लोकांविरुद्ध येथील मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी असल्याचे सांगत माझ्या ह्रुदयात श्वास असेपर्यंत मी हिंदु रक्षणासाठी कार्य करणार असल्याचे ही आ. टी. राजासिंग (MLA T. Raja Singh) यांनी सांगितले.
याप्रसंगी यज्ञश्वर महाराज सेलूकर यांच्यासह अन्य महंतांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मोर्चामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आ. टी. राजासिंग (MLA T. Raja Singh) यांच्या मोर्चासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या (Parbhani Muk Morcha) बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे दिवसभर शहरात ठाण मांडून होते.