परभणी (Parbhani Municipal Corporation) : जिंतूर रोड ते शासकीय स्त्री रुग्णालय, अमरधाम स्मशानभुमीकडे जाणार्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे (Parbhani Municipal) महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. गुरुवार ४ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावरुन पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे. गरोदर स्त्रियांना या रस्त्यावरुन जावे लागते. रस्ता एवढा खराब झाला आहे की कुठे रस्त्यातच गर्भवतीची प्रसुती होते, असे वाटत आहे. याच मार्गाने स्मशानभुमीकडेही जावे लागते.
शिवसेनेचे अनोखे आंदोलन, रस्त्याच्या दुरावस्थेकडे वेधले लक्ष
आयुष्याचा शेवटचा प्रवास सुध्दा (Parbhani Municipal) महापालिकेच्या उदासीनतेमुळे कठीण झाला आहे. मनपाकडून केवळ कर लावल्या जात आहे. मात्र सुविधा दिल्या जात नाहीत. गुरुवारी शिवसेना महिला आघाडीकडून या रस्त्यामध्ये बेशरमाची झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सौ. अंबिका डहाळे, सौ. वंदना कदम, सौ. कविता नांदूरे, किर्ती चौधरी, मंदाकिनी, शामा चांडक, संगीता टेहरे, वैशाली खांडे, गिरी, मिरा कवाळे, वैष्णवी सोनवणे, वैष्णवी भांडे, नेहा सोनवणे आदींची उपस्थिती होती.