परभणी शहर मनपाकडून नवीन प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प
परभणी (Parbhani Municipal Corporation) : जन्म मृत्यू नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्यावतीकरण करण्यात येत असल्याने मागील आठवडाभरापासून जन्म मृत्यू नोंदणीचे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे (Parbhani Municipality) शहर महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृह येथील कार्यालयातून नवीन प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प पडले आहे. नवीन जन्म झाल्यास तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर जन्म आणि मृत्युचे प्रमाणपत्र आवश्यक असते. विविध शासकीय कामांसाठी या (new certificate) प्रमाणपत्राची गरज असते. शहरी भागात महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाते.
प्रशासक असून सुद्धा महानगरपालिकामध्ये येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर नाममात्र शुल्क भरुन तीन ते चार दिवसात प्रमाणपत्र मिळते. मात्र मागील आठवडाभरापासून सॉफ्टवेअर मधील अद्यावती करणामुळे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे नव्याने एकही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. (Municipal Corporation) कार्यालयामध्ये जवळपास दोनशे पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. या अर्जांचा निपटारा होणे बाकी आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने अर्जदारांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्र तयार झाले का नाही हे विचारण्यास दररोज शेकडोच्या संख्येने अर्जदार महापालिका कार्यालयात येत आहेत.
परभणी महानगरपालिकेच्या अजब गजब कारभार
लवकरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल. जुने सॉफ्टवेअर बंद झाले आहे. नवीन सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे नवीन संगणक आणि आवश्यक साहित्याची मागणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच तांत्रिक अडचण दूर करुन (new certificate) प्रमाणपत्राचे वाटप सुरू करण्यात येईल.
– डॉ. कल्पना सावंत, रजिस्ट्रार जन्म – मृत्यू नोंदणी विभाग परभणी मनपा.