परभणी शहरात विविध ठिकाणी दुकानांची केली तपासणी
परभणी (Parbhani Municipal Corporation) : शहर महापालिकेच्या वतीने सिंगल युज प्लास्टीकचा वापरणार्यांवर मंगळवार २४ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ३५ हजार रूपयाचा दंड वसुल करण्यात आला.
३५ हजाराचा दंड वसुल
मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अतिरिक्त आयुक्त मिनिनाथ दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रज्ञानंद कांबळे, सोमनाथ बनसोडे, प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणाखाली मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत कच्छी बाजार, वसमत रोड, जिंतूर रोडवरील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सहा दुकानात सिंगल युज प्लास्टीक मिळाले. प्रत्येकी ५ हजार रूपये प्रमाणे ६ दुकानांना ३० हजाराचा दंड लावण्यात आला. या (Municipal Corporation) कारवाईत १७० किलो प्लास्टीक, पाणी पाऊचच्या ६ गोण्या जप्त करण्यात आल्या.
तसेच दुचाकीवर दुकानांना प्लास्टीक कॅरिबॅगचा पुरवठा करणार्यालाही ५ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे. या (Municipal Corporation) कारवाईमध्ये मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, मेराज अहेमद, विनय ठाकूर, स्वच्छता निरिक्षक श्रीकांत कुरा, न्यायरत्न घुगे, कुणाल भारसाकळे, लक्ष्मण जोगदंड, सौरभ जोगदंड, प्रल्हाद देशमाने, अब्दुल शादाब या कर्मचार्यांनी सहभाग घेतला. शहरातील व्यापारी तसेच नागरीकांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्पेâ करण्यात आले आहे.