परभणी (Parbhani Municipal Corporation) : मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर (Trupti Sandbhor) यांची बदली शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी झाली. बदली नंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर बुधवार २१ ऑगस्ट रोजी त्यांची याचिका मॅटने फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली. ही माहिती (Municipal Corporation) महापालिकेत धडकल्यानंतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर (Trupti Sandbhor) यांचा कार्यकाळ विविध वादामुळे चर्चेत राहिला. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी तृप्ती सांडभोर यांच्या बदलीचे आदेश धडकले. बदली नंतरही त्या सायंकाळ उशिरापर्यंत महापालिकेत हजर होत्या. त्यामुळे (Municipal Corporation) महापालिकेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. पोलीस बंदोबस्तात आयुक्त तृप्ती सांडभोर यांना त्यांच्या दालनाबाहेर काढण्यात आले. बदलीच्या आदेशानंतर त्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. सदर याचिका मॅटने फेटाळून लावली आहे.
परभणीकरांना न्याय मिळाला – अक्षय देशमुख
आयुक्त यांच्या कार्यप्रणालीला सर्वजण कंटाळले होते. शासनाने बदली केल्यानंतर परत परभणीत (Municipal Corporation) राहण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. एखाद्या अधिकार्याला लोकप्रतिनिधी किंवा नागरीक यांचा व्यक्तीगत विरोध करणे शोभत नाही, त्याचा हा परिणाम आहे. आज खर्या अर्थाने परभणीकरांना न्याय मिळाला आहे. आणि नवनियुक्त आयुक्त धैर्यशिव जाधव हे परभणीकरांच्या अडचणी जाणून घेऊन धुळ, रस्ते, लाईट, पाणी याचा प्रश्न मिटवितील हीच अपेक्षा. परभणीकरांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो.