परभणी (Parbhani) :- आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्या संकल्पनेतून यावर्षी पासून महापालिका (Municipality) दररोज सार्वजनिक गणेशोत्सवातील निर्माल्य संकलन करणार आहे. सर्व प्रभागाच्या प्रत्येक घंटागाडी मध्ये निर्माल्य संकलनासाठी एक वेगळी थैली ठेवण्यात आली आहे.
मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून उपक्रम
मंडळाचे निर्माल्याचे संकलन करुन सदर निर्माल्याची थैली चालकाच्या शेजारी ठेवण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. घंटागाड्या प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचून निर्माल्य संकलन करतील, या कामावर प्रभागातील स्वच्छता (Cleanliness) निरीक्षकांची देखरेख असणार आहे. संकलित निर्माल्यातून खत निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षकांनी गणेश मंडळापर्यंत घंटागाड्या पोहोचतील याचा पाठपुरावा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.