भोकर आणि परभणी पोलीस निष्क्रीय
परभणी (Parbhani Murder Case) : शहरातील इंदिरा नगर भागातून बेपत्ता झालेल्या युसूफ खान युनूस खान वय ४६ वर्ष या इसमाचा मृतदेह नांदेड रेल्वे पोलिसांना आढळून आला. सदर इसमाचा मृत्युमागे खून आहे की अपघात या विषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भोकर आणि परभणी पोलिसांनी वेळीच तपास न केल्याने बेपत्ता इसम मिळाला नव्हता. अखेर नांदेड रेल्वे पोलिसांकडून या इसमाच्या (Parbhani Murder Case) मृत्यू विषयी नातेवाईकांना माहिती मिळाली आहे.
रेल्वे पोलिसांकडून मिळाली माहिती
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, इंदिरा नगर भागात राहणारे युसूफ खान युनूस खान हे १२ जून रोजी बेपत्ता झाले होते. या बाबत १८ जुनला कोतवाली पोलिसात खबर देण्यात आली. याच दरम्यान काही दिवसांनी युसूफ खान यांना भोकर येथे मारहाण झाल्याचा प्रकार घडला. याची माहिती मिळाल्यावर बेपत्ता इसमाच्या भावाने ३० जुनला भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. युसूफ खान यांना १८ जून रोजी सकाळी (Murder Case) मारहाण झाली होती.
त्यानंतर युसूफ खान बेपत्ता होते. २१ जून रोजी त्यांचा मृतदेह अज्ञात स्थितीत नांदेड रेल्वे पोलिसांना मिळून आला. (Murder Case) मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या दरम्यान नातेवाईक देखील शोध घेत होते. सप्टेंबर महिन्यात नातेवाईकांना सदरचा मृतदेह युसूफ खान यांचा असल्याचे समजले. भोकर आणि परभणी पोलिसांच्या घोळात बेपत्ता इसमाचा शोध लागलाच नाही. अखेर या इसमाचा मृतदेह मिळून आला. इसमाच्या मृत्यू मागे नेमके कोण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.