सोमवारी नांदेड येथे इनकॅमेरा होणार शवविच्छेदन
परभणी (Parbhani Murder case) : पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली (District Jail) जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात (District Hospital) ३१ जुलै पासून उपचार सुरू होते. मात्र रविवार ४ ऑगस्ट रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून रुग्णालय परिसरात मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा होत आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, सोनपेठ तालुक्यातील थडीउक्कडगाव येथे मध्यप्रदेश येथील रामु शुक्ला बावणे याने २ जुलै रोजी त्याची पत्नी करीश्माचा खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
कारागृहात तब्येत बिघडल्याने ३१ जुलै रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा ४ ऑगस्ट रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाला. (Murder case) मृत्यू बाबत उलटसुलट चर्चा होत असल्याने त्याचे शवविच्छेदन सोमवार ५ ऑगस्ट रोजी नांदेड येथे न्यायाधिश आणि पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन इनकॅमेरा होईल, अशी सुत्रांची माहिती आहे.
मृत्यू बाबात उलट सुलट चर्चा
मागील चार दिवसांपासून आरोपी राजू बावणे याची प्रकृती बिघडल्याने (District Hospital) परभणी जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. त्याचा हा मृत्यू नसून त्याने आत्महत्या (Murder case) केल्याची चर्चा रुग्णालय परिसरात आहे. मात्र रुग्णालय व पोलीस प्रशासनाने याबाबत दुजोरा दिला नाही.
माहिती मिळताच परभणीतील अधिकारी घटनास्थळी दाखल
जिल्हा सामान्य रुग्णालयात (District Hospital) वैद्यकीय राजू बावणे याच्या मृत्युची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, शहर उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, पोनि. कामठेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या पोलीस, रुग्णालयातील अधिकारी दाखल झाले.