पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील घटना
मुलावर खुनाचा गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Murder Case) : प्लॉट नावावर करुन का देत नाही,या वादातुन मुलाने वडीलाच्या डोक्यात लोखंडी सब्बल घातली. जखमी वडीलाला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वडीलांचा मृत्यू झाला. हि घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील कलमुला येथे घडली. याप्रकरणी २४ जानेवारीला चुडावा पोलीस ठाण्यात (Parbhani Murder Case) मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अफसर यांनी तक्रार दिली आहे. आरोपी मुलगा शेख अकबर आणि मयत शेख अमिन शेख पिर अहेमद वय ६५ वर्ष यांच्यात प्लॉट वरुन वाद झाला. मुलाने नवी आबादी येथील प्लॉट माझ्या नावावर का करुन देत नाही. असे म्हणत २२ जानेवारीच्या सायंकाळी शेख अमिन यांच्या सोबत वाद करत लोखंडी सब्बलने मारहाण केली. गंभीर जखमी शेख अमिन यांना उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले. (Parbhani Murder Case) आरोपीने फिर्यादीला ही तुम्ही आमच्या भांडणात पडु नका तुम्हाला ही मारतो असे म्हणत धमकी दिली. आरोपी शेख अकबर याच्यावर चुडावा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि एन.जि.पोमनाळकर करत आहेत.




