परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील अनोळखी महिलेची ओळख पटवत स्थागुशाची कामगिरी
परभणी (Parbhani Murder case) : पूर्णा येथील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत शनिवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या महिलेची ओळख पटवून (Murder case) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना ४८ तासांच्या आत स्थागुशाच्या पथकाने अटक केली आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, शनिवार १४ सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानक परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्याने तो खून असल्याचे आढळून आल्याने (Parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, पोनि. विलास गोबाडे, सपोनि. पी.डी. भारती, सपोनि. रामकिशन नांदगावकर, पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोउपनि. प्रकाश इंगोले, पोह. रंगनाथ दुधाटे, भदर्गे, ढगे, निलपत्रेवार, गायकवाड, मानेबोईनवाड, माळकर, चौरे, जुक्टे, तोटेवाड, कौटकर, लटपटे, पोतदार, शब्बीर पठाण यांनी सदरची कारवाई केली. फॉरेन्सीक टिमच्या मदतीने मयत महिला रमाबाई चिकाटे वय ५० वर्ष रा. विजय नगर पूर्णा यांची ओळख पटविण्यात आली.
त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास केला असता सदर महिलेचा माणिक मुळे या इसमाशी दारु पिण्याच्या कारणावरुन वाद झाला. सदर महिलेने दारु पिण्यासाठी दहा रुपये मागितले असता तिला पैसे न दिल्याने तिने चप्पलने मारहाण केली. याचा राग मनात धरुन आरोपींनी दारु पाजण्याच्या बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेत दोघांनीही दारु पिली. त्यानंतर माणिक मुळेच्या ओळखीचे आणखी दोघेजण तेथे आले. त्यानंतर चौघांना एकत्रित बसून दारु पिली. यावेळी चप्पलने मारल्याच्या कारणावरुन सदर महिलेचे तोंड व डोके दगडाने ठेचत तिचा खून करुन (Murder case) मृतदेह काटेरी झुडूपात फेकून दिला. या प्रकरणी माणिक रामचंद्र मुळे रा.पूर्णा, आवेज कुरेशी रा.पूर्णा, शादुल कुरेशी रा.पूर्णा तिघांना स्थागुशाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर अनोळखी मयत महिलेची ओळख पटवून तत्परतेने आरोपींना अटक केल्याने (Parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थागुशाच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.