परभणीतील ताडकळस पोलीसात गुन्हा दाखल
परभणीत/ताडकळस (Parbhani Murder Case) : परभणीला चल, दारु पिऊ मजा करु असे म्हणल्यानंतर नकार दिल्याने एका युवकाला काठीने जबर मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास परभणी तालुक्यातील पिंगळी येथे घडली. या (Murder Case) प्रकरणी दोन जणांवर (Tadakalas Police) ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही आरोपी ताब्यात
शेख गौस शेख महेबुब रा. पिंगळी, असे मयताचे नाव आहे. या बाबत मयताचे भाऊ शेख साबेर यांनी (Tadakalas Police) ताडकळस पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपींनी शेख गौस याला परभणीला चल दारु पिऊन मजा करु, असे म्हणाले. यावर गौस याने नकार दिल्याने आरोपी आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. यात आरोपींनी गौसच्या डोक्यात, चाळ्यावर, मानेवर, पाठीवर जबर मारहाण करत त्याचा खून केला. या (Murder Case) प्रकरणी शेख समीर शेख नसीर, शेख नसीर शेख मुसा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. नागरगोजे करत आहेत. घटनास्थळाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सपोनि. गजानन मोरे यांनी भेट दिली.