परभणी शहरातील रोशनी नगर येथील घटना
परभणी (Parbhani Murder Case) : तु खुप मोठी चुक केलीस असे म्हणत एका १९ वर्षीय युवकाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना परभणी शहरातील रोशनी नगर भागात घडली. या प्रकरणी १९ जुलै रोजी (Parbhani Police) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके या युवकाने काय केले होते. याचे कारण मात्र पुढे आले नाही.
कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल
शाहरुख हुसेन पठाण वय १९ वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे. या बाबत आयशा शेख यांनी फिर्याद दिली आहे. १६ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ या दरम्यान आरोपींनी ज्वारी भरायची आहे, असे म्हणत शाहरुख पठाणला आपल्या सोबत नेले. त्याने खुप मोठी चुक केली आहे, असे म्हणत शाहरुखच्या पोटात लाथा मारून त्याला (Parbhani Murder Case) गंभीर जखमी करत त्याचा खून केला. या प्रकरणी शेख गौस, शैजादीबी शेख, मुन्नु शेख, वहिदाबी शेख यांच्यावर कोतवाली पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि कासले करत आहेत. युवकाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. या ठिकाणी मोठा जमाव झाला होता. (Parbhani Police) अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.