मृत्युस कारणीभुत ‘रल्या प्रकरणी परभणीच्या जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल!
परभणी/जिंतूर (Parbhani Murder Case) : डिजेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त केल्याने मिरवणुकीत नाचणार्या एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली होती. सदर युवकाच्या मृत्युस (Murder Case) कारणीभुत ‘रल्या प्रकरणी एकूण आ’ जणांवर (Jintur Police) जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना डिजेच्या आवाजामुळे संदीप विश्वनाथ कदम वय ३८ वर्ष रा. बोर्डी ता. जिंतूर या युवकाचा मृत्यू झाला होता. तर इतर तिघेजण अस्वस्थ झाले होते.
डिजेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याने संदीप कदम याच्या छातीत दुखून हृदयविकाराचा झटका येत त्याचा मृत्यू झाला. संबंधित युवकाच्या मृत्युस (Murder Case) कारणीभुत राहिल्याने सपोनि. बालाजी पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हरीओम विजय टोकशे, सुनील रमेश इक्कर, केरबा संजय चव्हाण, विकी काशीराम पवार, अशोक संजय चव्हाण, बबनराव रामराव कोडके, अक्षय सोपान ससाणे, नवनाथ गणपतराव कुडूक यांच्यावर (Jintur Police जिंतूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. लोकडे करत आहेत.