परभणी (Parbhani Murder case) : जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाजवळ एका (Woman Death) महिलेचा मृतदेह बुधवार १२ जून रोजी आढळून आला होता. या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (Crime Branch) यश आले आहे. अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात सेलू तालुक्यातील (Selu Taluka) कुपटा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी (Jintur Police) जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे.
जिंतूर येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल
माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास येलदरी जलाशया जवळील रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नाही. (Jintur Police) पोलिसांनी शोध घेतला असता सदर महिला जिंतूर येथील खैरी प्लॉट या ठिकाणची राहणारी असून तिचे नाव वैशाली जालिंदर तामडे, असे असल्याचे पुढे आले. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशाने स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलावर खान, रवी जाधव, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. (Jintur Police) पोलिसांना महिलेचा खून सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ दिनकर इक्कर याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली.
आरोपीला स्थागुशाने घेतले ताब्यात
या माहितीवरुन (Jintur Police) पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे मयत महिले सोबत अनैतिक संबंध होते. महिला आरोपीने सांगितल्या प्रमाणे वागत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आरोपीने दुचाकीवर बसवून महिलेला येलदरी येथे जलाशयाच्या बाजुस मुरुमखेडा गावाच्या दिशेने मोकळ्या टेकडीवर फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादात आरोपीने साडीच्या पदराने महिलेचा गळा आवळून तिचा (Murder case) खून केला.