परभणी/ताडकळस (Parbhani Murder) : गावातीलच मुलीशी प्रेम विवाह केल्यामुळे नेहमीच वडील व भाऊ मारहाण (Parbhani Murder) करीत असत. याच कौटुंबिक वादातून पिंपरी देशमुख येथील एका २५ वर्षीय तरूणाचा खून झाला असळ्याची घटना सोमवार १० जून रोजी उघडकीस आली. ताडकळस (Parbhani Police) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयताचे वडिल व भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी वडिल, भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी देशमुख येथील गोविंद महादेव अवकाळे वय २५ वर्षे या तरुणाने गावातीलच एका मुलीशी दोन महिन्यांपूर्वी आळंदी या ठिकाणी प्रेमविवाह केला होता. या प्रेम विवाहामुळे नेहमीच कौटुंबिक वाद निर्माण होऊन वडिलांनी व भावाने गोंविदला मारहाण (Parbhani Murder) देखील केली होती.परंतु घरगुती वाद असल्याने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. लग्न झाल्यावर गोविंद हा पत्नीला घेऊन पुणे येथील शिक्रापूर येथे खासगी नौकरी करीत होते. याविषयी मयताच्या पत्नीने अधिक माहिती अशी सांगितली की,शनिवार ८ जुन रोजी दुपारी २ वाजता गोविंद यांना फोनवरून त्यांचे वडील महादेव यांनी गावाकडे बोलावले होते. पत्नीने गोविंद यांना गावाकडे जाण्यास विरोध केला होता.
परभणीच्या पिंपरी देशमुख येथील घटना
गोविंद मात्र गावाकडे आले होते. वडील महादेव अवकाळे वय ५० वर्षे व भाऊ व्यंकटेश अवकाळे वय २३ यांनी शेतातील आखाड्यावर डोक्यात व मानेवर गंभीर मारहाण (Parbhani Murder) केली असल्याचे पत्नी श्रध्दा यांनी फोनवरून सांगितले. जखमी गोविंद यांना शेजार्यांनी (Parbhani Hospital) जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या ठिकाणी डाँक्टरांनी मयत घोषित केले.या ताडकळस ठाण्याचे सपोनि कपिल शेळके, पोउपनि. शिवकांत नागरगोजे, पोउपनि. गजानन काठेवाडे, जमादार अप्पाराव वर्हाडे यांनी घटनास्थळी धाव पंचनामा केला. घटनास्थळी (Parbhani Police) अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, स्थागुशाचे सपोनि.राजु मुत्यपोड आदींनी भेट दिली. श्वानपथक व फिंगरप्रिंट घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.