परभणीत मुस्लिम महिला संघटन आक्रमक
परभणी (Muslim Women Organization) : अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचना दरम्यान महाराजाने इस्माल धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व त्यांच्या पत्नी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे इस्माल धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी (Muslim Women Organization) मुस्लीम महिला संघटनच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी नाहीतर राजीनामा द्यावा
निवेदनावर पठाण दुर्राणी खान, नुसरत बाजी, सय्यदा इशरत फातेमा, मेहराज अंजुम, जरीना पटेल, सय्यदा निदा, मैमुना अंजुम, जानु बी, सबिहा बेगम, आयेशा बेगम, गजाला बेगम, यासमीन, महेक आदींच्या स्वाक्षर्या आहेत.