छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला सत्कार
परभणी ( Parbhani ) सोनपेठ विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर आ.राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांचे पहिल्यांदाच सोनपेठ नगरीत आगमनानिमित्त भव्य नागरी सत्काराचे आयोजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. सोनपेठ तालुक्यातील विटागावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य असा राजकीय प्रवास लाभलेले राजेश विटेकर हे तिसरे आमदार आहेत. २६ वर्षानंतर विटेकरांच्या रुपाने तालुक्याला आमदार पदाची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा शुक्रवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्याला माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दशरथ सुर्यवंशी, उप सभापती उत्तम जाधव, रंगनाथ सोळंके, रमाकांत जहागिरदार, विठ्ठल सुर्यवंशी, मारोती रंजवे, अमर वडकर, गौतम हत्तीअंबीरे, संजय काबरा, सुहास काळे, श्रीकांत विटेकर, मदन विटेकर, रमाकांत राठोड, निलेश राठोड, दिगंबर भाडुळे, उसमान कुरेशी, राम नवले, मदन भोसले, लक्ष्मीकांत देशमुख, रंगनाथ सोळंके यांसह तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन संदिप लष्करे, पददेवा जोशी यांनी केले.
ग्रामीण भागातील अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या रुपाने युवा आणि तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचा उपयोग युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, सोनपेठ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत सर्वांगिण विकासासाठी कटीबद्द राहणार आहे. माझ्या भव्य दिव्य सत्कारामुळे मी भावूक झालो असून माझी जबाबदारी वाढली आहे. – आ. राजेश विटेकर, विधान परिषद सदस्य