परभणी शहरातील मंजूर झालेल्या रस्त्यांचे काम आठवड्यात सुरू होणार
परभणी (parbhani) : जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Offices) आज मतदारसंघातील विविध प्रश्नांवर कार्यसम्राट आमदार डॉ राहुल पाटील साहेब यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, महावितरणचे अधिक्षक अभियंता माने, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता शिंदे, स्वप्नील रुद्रवार, ,मुंढे, ईटकर, शेळके, संजय गाडगे, संग्राम जामकर आदी उपस्थित होते.
आ. डॉ. राहुल पाटील याची जिल्हाधिकारी सोबत बैठक
शहरात मनपा हद्दीतील रस्ते बांधकाम विभागाकडे (Construction Department) वर्ग करण्यात आले आहेत. त्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. परंतु अजुनही कामे सुरु नाहीत, कामांना मंजुरी मिळुनही सुरु का करत नाही, असा सवाल करत आमदार डॉ राहुल पाटील साहेब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदरील कामांना (code of conduct) आचारसंहिताची अडचण नाही, त्यामुळे तात्काळ कामांना वेग देण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसात मंजुर रस्त्यांची कामे सुरु करण्यात येतील असे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
हलक्या पावसाने बत्ती गुल
परभणी शहरासह (Parbhani District) ग्रामीण भागात सातत्याने विज पुरवठा खंडित होत आहे. हलक्या पावसाने देखील विज गुल होत असल्याने यावर ताक्ताळ उपाययोजना करा, अशी सुचना आमदार राहुल पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. लवकरच सुधारणा करून विज सुरळीत राहण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातील असे, अधीक्षक अभियंता माने यांनी सांगितले.